Site icon Kokandarshan

वेंगुर्ले येथील झुलत्या पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

वेंगुर्ला, दि.१६: येथे नव्याने उभारण्यात आलेल्या झुलत्या पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या पुलाचा पर्यटनाच्या वाढीसाठी फायदा होणार आहे असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान वेंगुर्ला शहर नळपाणी परवठा योजनेचे ही उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अधिक्षक अभियंता छाया नाईक,कार्यकारी अभियंता अनामिका जाधव,उपविभागीय अभियंता संजय दहिफळे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, नागरिक व पर्यटक उपस्थित होते.

Exit mobile version