Site icon Kokandarshan

मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

सिंधुदुर्ग, दि.१५ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार दि.१६ फेब्रुवारी २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वा.चिपी जि. सिंधुदुर्ग विमानतळ येथे आगमन व मोटारीने टेलिफोन एक्स्चेंज ऑफीसजवळ, वेंगुर्ला जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १७ वे त्रैवार्षिक महाअधिवेशन व शिक्षण परिषद स्थळ टेलिफोन एक्स्चेंज ऑफीसजवळ, वेंगुर्ला आगमन व कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२.०० वाजता मोटारीने वेंगुर्ला बंदरकडे प्रयाण,दुपारी १२.१० वाजता वेंगुर्ला बंदर येथे आगमन,दुपारी १२.१५ वाजता वेंगुर्ला बंदर येथील झुलत्या पूलाचा व निशांत तलाव टप्पा-२ चा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ. वेंगुर्ला बंदर जि.सिंधुदुर्ग.दुपारी १२.४५ ते १.०५ वाजता राखीव. दुपारी १.०५ वाजता मोटारीने चिपी जि.सिंधुदुर्ग विमानतळाकडे प्रयाण. दुपारी १.३५ वाजता चिपी जि. सिंधुदुर्ग विमानतळ येथे आगमन व विमान जळगावकडे प्रयाण करणार आहे.

Exit mobile version