देवेंद्र उर्फ बंड्या गावडे यांच्या संकल्पनेतून जत्रेत साकारण्यात आलेला दीपोत्सव ठरला लक्षवेधी
सावंतवाडी,दि.१४: तालुक्यातील तिरोडा गावात श्रीदेवी मूळ भूमिका गावडे वस पंचायतन कुळकर देवाची वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळ पासूनच भाविकांची देवीच्या दर्शनासाठी गर्दी होती.
या जत्रोत्सवास आकर्षण म्हणजे देवेंद्र उर्फ बंड्या गावडे यांच्या संकल्पनेतून दीपोत्सव करण्यात आला सदर कार्यक्रमास भाविक तसेच परिसरातील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने या दीपोत्सवास भाग घेतला व दीपोत्सव कार्यक्रम हे या जत्रोत्सवाचे आकर्षण ठरले. यामुळे मंदिर परिसरात एक वेगळी रोषणाई पाहायला मिळाली.