सरपंच,उपसरपंचासह ग्रामस्थ भाजपात दाखल
सिंधुदुर्ग,दि.१४ : ग्रामपंचायत ओंबळचे सरपंच अरुण राजाराम पवार, उपसरपंच प्रवीण पवार, यांच्यासह सदस्य व ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सरपंच, उपसरपंच ,सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या या पक्ष प्रवेशामुळे ओंबळ येथे ठाकरे सेनेला भाजपा आमदार नितेश राणे यांनी धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे.
कणकवली येथे ओमगणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सरपंच अरुण राजाराम पवार, उपसरपंच प्रवीण पवार याच्या सह ग्रामस्थ शरद पवार, सहदेव पवार, जितेंद्र पवार, चंद्रकांत पवार, महेश ओंबळकर, चंद्रकांत गावडे, नरेंद्र पवार, राजेंद्र पवार, अजित पवार, प्रशांत पवार,आदींनी पक्ष प्रवेश केला.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, डॉ. अमोल तेली, संदीप साटम, बंड्या नारकर, अमित साटम, राजेंद्र शेट्टे, आदी सह असंख्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.