Site icon Kokandarshan

ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांना मातृशोक; जयश्री नाईक यांचे वृद्धापकाळाने निधन

सावंतवाडी, दि.०३ : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांच्या मातोश्री श्रीमती जयश्री राजाराम नाईक (वय ९४) यांचे आज शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने नाईक परिवारावर शोककळा पसरली आहे.
श्रीमती जयश्री नाईक यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात चार मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांच्यासह सेवानिवृत्त बँक अधिकारी प्रकाश नाईक, निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी प्रदीप नाईक आणि निवृत्त एसटी कर्मचारी प्रमोद नाईक यांच्या त्या मातोश्री होत.

Exit mobile version