सावंतवाडी,दि.०२: तालुक्यातील वेर्ले तळेवाडी येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या तळेकर मंदिराचा भूमीपूजन सोहळा अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे युवा नेते विशालजी परब यांच्या शुभहस्ते या मंदिराचे विधीवत भूमीपूजन आणि पायाभरणी करण्यात आली. विशाल परब यांचे गावात आगमन होताच तळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
वेर्ले तळेवाडीच्या विकासकामांत आणि सामाजिक उपक्रमांत विशाल परब यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभत असल्याने ग्रामस्थांनी त्यांच्याबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना विशाल परब यांनी मंदिराच्या नूतन कामाला शुभेच्छा दिल्या आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव पाठीशी राहू, असे आश्वासन दिले. विशालजींच्या उपस्थितीमुळे या धार्मिक सोहळ्याला एक वेगळी ऊर्जा मिळाल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
या मंगलप्रसंगी सैनिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, जिल्हा बँक संचालक रवी मडगांवकर, सैनिक बँक अध्यक्ष बाबूराव कविटकर, तसेच बाबा राऊळ, दीपक पुंडलिक राऊळ, आनंद राऊळ, संजय राऊळ, शंकर राऊळ, दत्ताराम राऊळ, दीपक महादेव राऊळ, वासुदेव राऊळ, चंद्रकांत राऊळ, राजेंद्र राऊळ, भगवान राणे, मोहन राऊळ, मनीष राऊळ, पल्लवी राणे, दिलीप राऊळ, स्वप्निल राऊळ, सुहास राऊळ, अंतोन रोड्रिक्स, रवीकमल सावंत, केतन आजगावकर, संतोष धरणे यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला मंडळ, तरुण वर्ग आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

