Site icon Kokandarshan

आजगावच्या माजी सरपंचांच्या पत्नी सुलोचना पांढरे यांचे वृद्धापकाळाने निधन..


सावंतवाडी,दि.०१: तालुक्यातील आजगाव येथील रहिवासी आणि आजगावचे माजी सरपंच कै. सदगुरू उर्फ भाई पांढरे यांच्या पत्नी श्रीमती सुलोचना सदगुरु पांढरे (वय ८२) यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने आजगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

श्रीमती पांढरे या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात किशोर, चंद्रहास व उदय हे तीन मुलगे, सूना, पुतणे, पुतण्या, नातवंडे, जाऊ आणि चुलत दिर असा मोठा परिवार आहे. त्या पत्रकार सचिन रेडकर यांच्या मामी होत.

Exit mobile version