Site icon Kokandarshan

राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्यामार्फत २०२२-२०२३ साठी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर..

आसोली नं.१ चे उपशिक्षक.. प्रफुल्ल रमेशराव ठोकरे यांच्या नावाची वर्णी..

वेंगुर्ला, दि.१०: श्रीमंत छत्रपती खासदार श्री उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आसोली शाळा .नंबर एक २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रशालेचे उपशिक्षक प्रफुल्ल रमेशराव ठोकरे यांची निवड करण्यात आली आहे.

श्रीमंत छत्रपती खासदार श्री उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे (२४फेब्रुवारी) औचित्य साधून शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्यामार्फत हा पुरस्कार दिला जातो.

सदर पुरस्कारासाठी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर व सल्लागार नारायण सावंत यांच्या तज्ञ समितीने या नावाची शिफारस केली आहे.

हा पुरस्कार कार्यक्रम जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आसोली नंबर १ मध्ये १५ फेब्रुवारी २०२३रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

Exit mobile version