Site icon Kokandarshan

सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व..

श्रद्धा राजे भोसले नगराध्यक्षपदी विजयी

सावंतवाडी,दि.२१: नुकत्याच पार पडलेल्या सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा राजे भोसले यांनी शानदार विजय संपादन करत शहराच्या प्रथम नागरिक होण्याचा मान मिळवला आहे. नगराध्यक्ष पदासोबतच विविध प्रभागांमध्येही भाजपने आपली ताकद दाखवून दिली असून, अनेक जागांवर विजय मिळवला आहे.

विविध प्रभागांमधील विजयी उमेदवारांचा कल पाहता, प्रभाग एकमधून काँग्रेसचे तौकीर शेख आणि भाजपच्या दीपाली भालेकर यांनी बाजी मारली आहे. प्रभाग दोनमध्ये शिवसेना शिंदे गटाचे बाबू कुडतरकर आणि भाजपच्या सुनीता पेडणेकर विजयी झाल्या आहेत. प्रभाग तीनमध्ये भाजपने दोन्ही जागा खिशात घातल्या असून आनंद नेवगी आणि मोहिनी मडगांवकर यांनी विजय मिळवला आहे. प्रभाग चारमध्ये शिवसेना उबाठा गटाचे देवा टेमकर आणि शिवसेना शिंदे गटाच्या सायली दुभाषी यांनी विजय मिळवला.

प्रभाग पाचमध्ये भाजपने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करत सुधीर आडीवरेकर आणि दुलारी रागणेकर यांना विजयी केले आहे. प्रभाग सहा आणि प्रभाग सातमध्ये शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले, जिथे अनुक्रमे शर्वरी धारगळकर व देवा सूर्याजी आणि स्नेहा नाईक व संजू परब यांनी विजय मिळवला. प्रभाग आठमध्ये भाजपचे सुकन्या टोपले आणि प्रतीक बांदेकर यांनी विजय मिळवला आहे. प्रभाग नऊमध्ये भाजपच्या निलम नाईक आणि शिवसेना शिंदे गटाचे अजय गोंदावळे विजयी झाले, तर प्रभाग दहामध्ये भाजपने पुन्हा दोन्ही जागा जिंकत वीणा जाधव आणि अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांनी यश मिळवले आहे. एकूणच या निकालांमुळे सावंतवाडीत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Exit mobile version