Site icon Kokandarshan

सावंतवाडीत विशाल परब यांचा ‘ऑन फिल्ड’ सक्रिय सहभाग: भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण!

सावंतवाडी,दि.०२:भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते विशाल जी परब हे सावंतवाडी शहरात आणि परिसरात ऑन फिल्ड म्हणजेच प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत.

त्यांच्या या सक्रियतेमुळे सावंतवाडीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.विशाल परब हे सावंतवाडी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक बुथवर जाऊन कार्यकर्त्यांशी थेट भेट घेत आहेत. बुथवरील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत आहेत आणि त्यांच्या समस्या तसेच सूचना जाणून घेत आहेत.या भेटींचा मुख्य उद्देश संघटन मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा आहे

त्यांच्या या थेट संवादामुळे आणि सक्रिय सहभागामुळे सावंतवाडी भाजप अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version