Site icon Kokandarshan

अन्नपूर्णा कोरगावकर यांचे मतदारांना भावनिक आवाहन

सावंतवाडी, दि.३०: प्रिय सावंतवाडीकर,
मी अन्नपूर्णा कोरगावकर, माजी उपनगराध्यक्ष — आपल्या सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वोत्तम सेवा देण्याच्या दृढ निश्चयाने नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार उभी आहे.

सावंतवाडीचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही टप्प्यांशी माझा भावनिक व जिव्हाळ्याचा संबंध आहे. अनेक वर्षांच्या सार्वजनिक कार्यातून मला नागरिकांच्या अपेक्षा, अडचणी आणि आशा जवळून समजल्या आहेत. या अनुभवातूनच एक सुजाण, जबाबदार, आणि लोकाभिमुख नगरपरिषद उभी करण्याचे ध्येय मी ठेवले आहे.

आपल्या शहरातील मुलांचे शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक नियोजन, तसेच प्रत्येक नागरिकापर्यंत सेवा पोहोचवणारे उत्तरदायी स्थानिक स्वराज्य–व्यवस्थापन हे माझ्या कामाचे केंद्रबिंदू राहतील.

आपल्या विश्वासाने आजवर ज्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, त्या पुढे आणखी काटेकोरपणे आणि निष्ठेने निभावण्याची तयारी मी दाखवते.

धनशक्ती ही कायम स्वरूपी नसते त्यामुळे आपला सहकार्यपूर्ण प्रतिसाद आणि विधायक सूचना या माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाच्या आहेत.

आपल्या हक्काच्या अन्नपूर्णा वहिनींना मेणबत्ती या निशाणी समोरील बटण दाबून प्रचंड मतांनी निवडून दया
असे भावनिक आवाहन माजी उपनगराध्यक्ष सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी केले आहे.

Exit mobile version