Site icon Kokandarshan

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी सोमवार पासून मार्गदर्शन वर्ग…

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम….

सावंतवाडी,दि.२८: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने AISSEE 2026 (ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा – इयत्ता सहावी) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देऊन प्रवेश परीक्षेत यश मिळवून देणे हा आहे. यामध्ये अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांकडून ऑनलाईन पद्धतीने नियमित अध्यापन केले जाणार आहे.

अभ्यासक्रमामध्ये गणित, इंग्रजी, सामान्यज्ञान, इंटेलिजन्स यांसोबत OMR प्रॅक्टिस, दैनिक सराव, तसेच आठवड्याला चाचण्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत अडचणींवर लक्ष देत शंका-निरसनही केले जाणार आहे. ही बॅच सोमवार, दि. १ डिसेंबर २०२५ पासून सुरू होत असून नाव नोंदणीसाठी 7875149717 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच खाली दिलेल्या गुगल फॉर्म लिंकचा वापर करावा असे आवाहन शाळेमार्फत करण्यात आले आहे. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfLJT9gfm4e3FTjPqcit8lLCc_WSYilPt5s2Ed80wadjYxwGQ/viewform?usp=dialog

Exit mobile version