Site icon Kokandarshan

सावंतवाडी तालुक्यातील पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद…

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले कौतुक

सावंतवाडी, दि.०९: तालुक्यातील पोलीस तसेच आंबोली आऊट पोस्ट पोलीस यांची कामगिरी दमदार व कौतुकास्पदच आहे, अशा शब्दात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तालुक्यातील पोलीस यंत्रणेचे कौतुक केले.

अलीकडच्या काळात तालुक्यात वाढलेले गुन्हेगारी यावर नियंत्रण ठेवत पोलिसांनी आपले काम चोख बजावले आहे.

काही दिवसापूर्वी आंबोली घाटात खून करुन आणून टाकलेले मृतदेह ज्याची पाळेमुळे सांगली इस्लामपूर पंढरपूर या भागामध्ये वसली असताना खून प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व आरोपींना गजाआड केल्यामुळे सावंतवाडी पोलीस त्यांचे अधिकारी यांनी दाखवलेले कर्तव्यदक्षता खरोखरच वाखाण्याजोगी आहे. याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करत आहे आणि त्यांना धन्यवाद ही देत आहे, अशा तऱ्हेने माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पोलिसांचे तोंड भरून कौतुक केले.

Exit mobile version