Site icon Kokandarshan

भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या सर्वेक्षा ढेकळेचे वक्तृत्व स्पर्धेत यश…..

सावंतवाडी,दि.२३: मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्व. डॉ. सौ. मालती दत्तात्रय खानोलकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित वक्तृत्व स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी सर्वेक्षा नितीन ढेकळे हिने पाचवी ते सातवी गटातून “मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावर प्रभावी वक्तृत्व सादर करून द्वितीय क्रमांक प्राप्त प्राप्त केला. यावेळी सर्वेक्षाला रोख रक्कम, ग्रंथ आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तिच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले आणि मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version