Site icon Kokandarshan

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य फिजिओथेरपी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

तरुण फिजिओथेरपिस्टसाठी ‘नवे युग’! मान्यवरांनी लावली हजेरी

कोल्हापूर :दि.२२ पश्चिम महाराष्ट्रातील फिजिओथेरपी क्षेत्राला नवी दिशा देणारी आणि व्यावसायिक कौशल्यांच्या उन्नतीसाठी मैलाचा दगड ठरलेली IHO International Triple Certification ही ऐतिहासिक कार्यशाळा कोल्हापूरमध्ये भव्यतेने पार पडली. फिजिओथेरपी क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या मानकांना गाठण्याचे ध्येय घेऊन झालेल्या या मेगा वर्कशॉपला महाराष्ट्र व कर्नाटकातून ८० हून अधिक फिजिओथेरपिस्ट आणि विद्यार्थ्यांनी उत्साहात हजेरी लावली.
या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन अध्यक्ष डॉ. ऋषिकेश रवींद्र पोळ आणि त्यांच्या कोर टीमने केले. देशातील आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त फिजिओथेरपिस्ट —
डॉ. विवेक भानुशाली (हेड फिजिओ – इंडिया कबड्डी टीम) आणि
डॉ. महेश शिंदे (हेड फिजिओ – प्रो कबड्डी लीग)यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे सहभागी विद्यार्थ्यांना थेट प्रॅक्टिकल ज्ञान, advanced techniques आणि इजा व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाले.
कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. त्यामध्ये—DY Patil Pharmacy College चे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभु जंगमे डॉ. प्रांजली धमणे, डॉ. संध्या धवळे, डॉ. श्रीकृष्ण काळे, डॉ. अन्विता कुमार
Goodwill Ambassador of India श्री. विश्वजीत काशीद
महिला उद्योजिका अंजोरी सचिन कुम्भोजे,महानभारत केसरी पै. माऊली जमदारे भारतीय महिला व्हॉलीबॉल टीमचे माजी प्रशिक्षक अजित पाटील प्रो कबड्डी खेळाडू आर्यवर्धन नवले यांचा समावेश होता.
सहभागी सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मुख्य भूमिका पार पाडणारे—CEO – डॉ. अथर्व मुळ्ये,
सचिव – यश बोडके आणि सोहम जाधव यांचेही कौतुक करण्यात आले.
DY पाटील ग्रुपसह मा. सतेज पाटील, मा. रुतुराज पाटील, मा. पृथ्वी पाटील यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी आयोजनाध्यक्ष डॉ. ऋषिकेश पोळ यांनी सांगितले,
“ही कार्यशाळा म्हणजे फक्त एक कार्यक्रम नाही—तर कुशल, सक्षम आणि जागतिक दर्जाचे
फिजिओथेरपिस्ट घडवण्याच्या नवीन युगाची सुरुवात आहे. विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये विकसित करून हजारो रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी ही संधी उपयोगात आणावी.”
फिजिओथेरपी क्षेत्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन, आधुनिक उपचारपद्धती आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाल्यामुळे ही कार्यशाळा विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी ज्ञानाचा खजिना ठरली. येत्या काळात आणखी उच्चस्तरीय उपक्रम राबवण्याचा संकल्प टीमने व्यक्त केला.

Exit mobile version