Site icon Kokandarshan

हरकूळ बुद्रुक सुतारवाडीतील उबाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत केला प्रवेश

कणकवली, दि.२१: जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पार्टीत इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी- कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात भाजप मध्ये पक्षप्रवेश करत आहेत. कणकवली तालुक्यातील हरकूळ बुद्रुक सुतारवाडी येथील असंख्य उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून,कामावर प्रेरित होऊन,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला.
यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अतुल मेस्त्री, दीपक मेस्त्री, अजय मेस्त्री, प्रमोद मेस्त्री, प्रवीण मेस्त्री, महेश मेस्त्री, लक्ष्मण मेस्त्री, जयदीप मेस्त्री, संदीप मेस्त्री, प्रकाश मेस्त्री, बाळकृष्ण मेस्त्री, रवींद्र मेस्त्री, सुवास मेस्त्री, दीपक मेस्त्री, प्रशांत मेस्त्री, कमलेश मेस्त्री अशा अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
या पक्ष प्रवेशावेळी माजी सभापती बाबासाहेब वर्देकर,भाजपचे पदाधिकारी राजू पेडणेकर, चंद्रकांत परब, तुकाराम खोचरे,परशुराम घाडीगावकर,उमेश सापळे,इमरान शेख, मामा माणगावकर, बाळू मोर्ये,निलेश तेली,सचिन तेली आदी उपस्थित होते.

Exit mobile version