Site icon Kokandarshan

झाराप – पत्रादेवी महामार्गावर भीषण अपघात..

सावंतवाडी,२८ : झाराप पत्रादेवी बायपासवर, मळगाव जोशी मांजरेकरवाडीलगत दोन कार मध्ये भीषण अपघात झाला.

सुदैवाने या अपघातात कोणतेही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही गाडींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबत अधिक माहिती अशी की,पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के हे आपल्या ताब्यातील कारने कुडाळच्या दिशेने जात असताना कुडाळ वरून गोव्याच्या दिशेने जाणारी कार दुभाजकाच्या पलीकडे येऊन त्यांच्या कारवर धडकल्याने झालेल्या अपघातात सोनटक्के यांच्यासह समोरील गाडीतील प्रवासीही जखमी झाले. कोल्हापूर येथील कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

या अपघातानंतर १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

यावेळी सावंतवाडी चे माजी सभापती राजू परब ,मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक जोशी, संजय जोशी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्य केले.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version