Site icon Kokandarshan

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून सीमा मठकरांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल!

सावंतवाडी,दि.१३: आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) सेनेकडून सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सीमा मठकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मठकर यांच्या उमेदवारीने सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळात लक्ष वेधले आहे.

यावेळी ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. अर्ज दाखल करताना माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, उपनेत्या जान्हवी सावंत, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, सुकन्या नरसुले आणि उमेदवार सीमा मठकर स्वतः उपस्थित होत्या.

माजी खासदार विनायक राऊत आणि संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीमुळे पक्ष नेतृत्वाने ही निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे दिसून येते. सीमा मठकर यांच्या माध्यमातून पक्ष एका सामाजिक कार्यकर्त्याला संधी देत असून, त्यांना निवडून आणण्यासाठी पक्ष पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या निवडणुकीमुळे सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता आहे.

Exit mobile version