Site icon Kokandarshan

सावंतवाडी नगरपालिकेसाठी महाविकास आघाडीला राष्ट्रवादीचा पाठिंबा; दोन जागांची मागणी

सावंतवाडी,दि.१३: आगामी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच शरद पवार यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा मठकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिली.

भोसले यांनी सांगितले की, सीमा मठकर यांना पाठिंबा देताना राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर उमेदवारीची मागणी केली असून, त्या जागांवर पुंडलिक दळवी आणि देवा टेंमकर यांना संधी द्यावी, असा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे देण्यात आला आहे.

यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच प्रवीण भोसले यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला रुपेश राऊळ यांची उपस्थिती होती. या बैठकीत विनायक राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली असून, त्यांनी राष्ट्रवादीकडून आलेल्या प्रस्तावाला ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याचे भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुढे बोलताना भोसले यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सीमा मठकर यांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होणार आहेत.

या बैठकीला पुंडलिक दळवी, देवा टेमकर, अनुप नाईक आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version