सावंतवाडी,दि.०१: न्हावेली (टेंववाडी) येथील रहिवासी श्रीमती शशिकला शशिकांत परब (वय ७३) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने परब कुटुंबावर आणि न्हावेली गावावर शोककळा पसरली आहे.
शशिकला परब या न्हावेलीचे माजी सरपंच, प्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्य शशिकांत परब उर्फ दादा वेंगुर्लेकर यांच्या पत्नी होत्या. तसेच त्या पत्रकार नीलेश परब यांच्या मातोश्री होत्या.
त्यांच्या पश्चात पती, पाच मुलगे, सूना, दीर, भावजय आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात त्यांचा आधारवड हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

