Site icon Kokandarshan

मळेवाड येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील काम तात्काळ सुरू करा…

अन्यथा ग्रामस्थांसमवेत उपोषण छेडण्यात येईल.. उपसरपंच हेमंत मराठे

सावंतवाडी, दि.०८: मळेवाड येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील काम तात्काळ सुरू करा अन्यथा ग्रामस्थांसमवेत उपोषण छेडण्याचा इशारा मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता धामणे यांना निवेदन देऊन दिला.
मळेवाड गावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सावंतवाडी शिरोडा मुख्य रस्ता ते शिरसाटवाडी भटवाडी रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला आहे.तब्बल पावणे दोन कोटी रुपये यासाठी निधी मंजूर झाला होता.सदर कामामध्ये समाविष्ट असलेल्या कामापैकी संरक्षक भिंती, रस्ता डांबरीकरण,भटवाडी पूल,गटार, पाण्याचे पाईप अशी विविध कामे अपूर्ण आहेत.तसेच जी कामे झालेली आहेत त्याचा दर्जा ही निकृष्ट आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या योजनेतच जर अशा प्रकारची कामे दिरंगाई होत असतील तर ही फार मोठी शोकांतिका आहे असे मराठी आणि निवेदनात म्हटले आहे.सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपण योग्य ती कार्यवाही करावी व कामात अनियमितता करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा कार्यालयासमोर ग्रामस्थां समवेत २१ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता निषेध आंदोलन करणार असल्याचा इशारा मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता धामणे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.तसेच मागणी पूर्ण न झाल्यास प्रसंगी मंत्रालयात व न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचेही मराठे यांनी निवेदनात म्हटलं आहे.

Exit mobile version