Site icon Kokandarshan

श्री समर्थ साटम महाराज वाचनालय दाणोली येथे “वाचन प्रेरणा दिन” निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर यांची लाभणार विशेष उपस्थिती

सावंतवाडी, दि .१२: “वाचन प्रेरणा दिन”चे औचित्य साधून वाचन संस्कृती विकसित करण्याकरिता सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज वाचन मंदिर येथे बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी वाचनालयाच्या वतीने ‘ग्रंथ प्रदर्शन’, ‘मी वाचलेले पुस्तक’, ‘वाचू आनंदे’ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे यांनी दिली आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष, कवी दीपक पटेकर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान यावेळी ग्रंथ प्रेमी श्री.आवळे यांनी वाचनालयासाठी स्नेह भेट म्हणून दिलेले “मारुती चितमपल्ली” व “जयंत नारळीकर” या दोन लेखकांच्या सुमारे पाच हजार रुपये किमतीच्या पुस्तकांचे ‘ग्रंथ प्रदर्शन’ देखील लावण्यात येणार आहे. याचे उद्घाटन कवी दीपक पटेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तसेच ‘तुम्ही वाचा मुले वाचतील!’ हा अभिनव उपक्रम देखील यावेळी संपन्न होणार आहे. सोबतच दाणोली व माडखोल केंद्रात नव्याने हजर झालेल्या शिक्षकांचे स्वागत वाचनालयाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष भरत गावडे यांनी कळविले आहे.

Exit mobile version