सावंतवाडी,दि.३० : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात निर्भीडपणे आवाज उठवणारे पत्रकार सिताराम गावडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाम पाठिंबा दर्शविला आहे.
मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सितारामजी आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध ज्या निर्भीडपणे व्यक्त होत आहात, त्यामुळे या धंद्यांना प्रोत्साहन देणारे व छुपा पाठिंबा देणारे आपल्याला नाहक बदनाम करण्याचा, धमकावण्याचा प्रयत्न करतील. पण आम्ही आपल्याला गेली अनेक वर्षे ओळखतो. आपण यांना भीक घालणार नाही, याची खात्री आम्हाला आहे. या लढाईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आपल्याला संपूर्ण पाठिंबा आहे, याची खात्री बाळगा.”
सिंधुदुर्गात गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. याविरोधात कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे सातत्याने आवाज उठवत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने गावडे यांच्या भूमिकेचे कौतुक केले असून, त्यांचा संघर्ष हा सर्वसामान्य जनतेच्या हिताचा असल्याचे नमूद केले आहे.
मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांच्या या भूमिकेमुळे अवैध धंद्यांविरोधातील लढाईला आणखी बळ मिळणार असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली हे
सिंधुदुर्गात अवैध धंद्यांविरोधातील लढाईसाठी मनसेचा सिताराम गावडे यांना पाठिंबा

