Site icon Kokandarshan

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या माडखोलमध्ये भव्य रक्तदान शिबिर

सावंतवाडी,दि.१९: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त, माडखोल येथील धवडकी शाळा क्रमांक दोनमध्ये उद्या, शनिवार दिनांक २० सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.

या सामाजिक उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अमित राऊळ, विनेश तावडे, शैलेश माडखोलकर, स्वप्निल राऊळ आणि भाऊ तायशेटे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरासोबतच, वाढदिवसाचे औचित्य साधून माडखोल धवडकी शाळा क्रमांक एक आणि दोनमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखील करण्यात येणार आहे.

या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अमित राऊळ यांनी दिली.

Exit mobile version