Site icon Kokandarshan

दोडामार्गमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन उपविभागीय कार्यालयाचे आज थाटात उद्घाटन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार लोकार्पण सोहळा; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा. नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती

दोडामार्ग,दि. १८ : दोडामार्ग येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या बहुप्रतिक्षित नूतन कार्यालयीन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज, गुरुवारी सायंकाळी ४ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या दिमाखदार सोहळ्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, बांधकाम राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक आणि माजी मुख्यमंत्री तथा खासदार श्री. नारायण राणे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच, जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.) आणि कोकण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता श्री. शरद राजभोज हे देखील याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

दोडामार्ग तालुक्याच्या विकासाला गती देणाऱ्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक बांधकाम उपविभाग, दोडामार्ग यांनी केले आहे. या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता श्री. मिलिind कुलकर्णी, कार्यकारी अभियंता श्रीमती पुजा इंगवले, उपविभागीय अधिकारी (दोडामार्ग) श्रीमती सीमा गोवेकर आणि कनिष्ठ अभियंता श्री. संभाजी घंटे यांनी केले आहे. या नूतन वास्तूमुळे विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळण्यास मदत होणार असून, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा पुरवणे शक्य होणार आहे.

Exit mobile version