सिंधुदुर्ग,दि. १०: राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे गुरुवार, दिनांक ११ सप्टेंबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध बैठका आणि उद्घाटन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
सविस्तर कार्यक्रमानुसार, मंत्री राणे यांचे गुरुवारी सकाळी ६ वाजता रत्नागिरीत आगमन होईल. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता जयगड येथील जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत आणि काजू महामंडळाच्या संचालकांसोबत त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
यानंतर सकाळी ९.४५ वाजता नामदार नितेश राणे यांच्या हस्ते कोतवडे येथील भारतीय जनता पार्टीच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम आटोपून ते सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे प्रयाण करतील.
सिंधुदुर्गमध्ये दुपारी १ वाजता ओरोस येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ कार्यक्रमास ते प्रमुख उपस्थिती लावणार आहेत.

