सावंतवाडी,दि.१५: स्वातंत्र्यदिनानिमित्त गुरुवार १४ ऑगस्ट रोजी आंबोली मंडलाच्यावतीने कलंबिस्त येथील शहीद स्मारकाची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कलंबिस्त हायस्कूलचे विद्यार्थी आणि माजी सैनिकांनी सहभाग घेतला. यावेळी, स्वातंत्र्यसंग्रामात वीरमरण आलेल्या शहिदांच्या रणस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली आणि वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, आंबोली मंडळ सरचिटणीस बाळू शिरसाठ, सैनिक बँकेचे चेअरमन बाबुराव कविटकर, माजी सैनिक दिनानाथ सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी राजश्री सावंत, सरस्वती राजगे, सत्यवती पास्ते, सविता कदम, रोझिलिन रॉड्रिक्स आणि सुप्रिया पास्ते या वीरपत्नींचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहिदांच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सुभाष सावंत, सगुण पास्ते, अनंत सावंत, प्रकाश सावंत, यशवंत सावंत, रामचंद्र सावंत, विश्वनाथ सावंत, गजानन सावंत, विलास पास्ते, भगवान पास्ते, अरुण पास्ते, दत्ताराम घोगळे, यशवंत तावडे, तुकाराम पावस्कर, बाळा राजगे ,शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, प्रल्हाद तावडे, तसेच तालुक्यातील कार्यकारणी सदस्य भाऊ कोळमेकर, कृष्णा सावंत, प्रशांत देसाई,ओवळीये भूत अध्यक्ष सागर सावंत, कलंबित बूथ अध्यक्ष नामदेव पास्ते, प्रवीण सावंत, सावरवाड बूथ अध्यक्ष महेंद्र दळवी, शिरशिंगे बूथ अध्यक्ष गणपत राऊळ, वर्ले बूथ अध्यक्ष प्रसाद गावडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कलंबिस्त येथील शहीद स्मारकाची स्वच्छता, वीरपत्नींचा सन्मान

