Site icon Kokandarshan

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्या १५ ऑगस्ट रोजी होणार शेती संरक्षण शस्त्र परवान्यांचे वितरण

सिंधुदुर्ग दि. १४ : वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेती संरक्षण शस्त्र परवान्यांची परवानगी प्रक्रीया जिल्हा प्रशासनातर्फे नियमित केली जाते. शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे तसेच त्याच्या पिकांचे रक्षण व्हावे यासाठी पात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे नियमानुसार शस्त्र परवाना दिल्या जातो. या अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पात्र नवीन तसेच मृत परवानाधारक व्यक्तींच्या वारसांना शेती संरक्षण परवान्यांचे वितरण करण्यात १५ ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात नऊ जणांना परवान्यांचे वितरण करण्यात येणार आहे. हे वितरण शासकीय ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभा प्रसंगी पोलिस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग नगरी येथे होणार आहे.

जाहिरातींसाठी संपर्क : 9423958828

Exit mobile version