सावंतवाडी, दि.१४: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) चार कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.
यामध्ये कोलगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रोहित भाऊ नाईक, प्रणाली विजय टिळवे, आशिका अशोक सावंत आणि श्रीमती संयोगिता संतोष उगवेकर यांचा समावेश आहे.
निलंबनाचे कारण काय..?
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या चारही जणांवर भाजपविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
निलंबनाच्या पत्रात असे म्हटले आहे की, या कार्यकर्त्यांनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकार परिषदेमध्ये भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग व भारतीय जनता पार्टी विरोधात भाष्य केले होते. यावेळी आपण त्यांच्या या पत्रकार परिषदेमध्ये समर्थनार्थ त्यांच्या बाजूने उपस्थित असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यांची ही वर्तणूक भाजप पक्षविरोधी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून या चारही जणांना शिस्तभंगाची कारवाई करून तात्काळ पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असल्याचे भारतीय जनता पार्टी, आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ यांनी त्यांना पत्राद्वारे कारवाईबाबत कळवले आहे.
कोलगावातील ..त्या चार सदस्यांना पक्षाकडून निलंबनाचे पत्र

