सावंतवाडी,दि.७: माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे शिवसेनेने कोलगाव येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीतील मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप केले.
या कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शाळेमध्ये आणि अंगणवाडीत येत असलेल्या विविध समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचं आश्वासन दिलं.
यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
यावेळी माजी विभाग अध्यक्ष सुशांत ठाकूर, महिला विभागीय अध्यक्ष ॲड. सौ. शितल अभिजीत टिळवे, युवा विभाग प्रमुख मुकेश ठाकूर, बूथ प्रमुख आदेश गावडे, रविकिरण राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. सुधा ठाकूर आदी प्रमुख कार्यकर्ते आणि शिक्षक उपस्थित होते. शिंदे गटाच्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे.
शिंदेसेने मार्फत कोलगावातील जिल्हा परिषद शाळांना व अंगणवाडीतील मुलांना शालेय वस्तूंचे वाटप..

