Site icon Kokandarshan

मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला सह्याद्री फाउंडेशनकडून बेडशीट भेट..

सावंतवाडी,दि.२३: मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, सावंतवाडी येथील सह्याद्री फाउंडेशनने उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रुग्णांसाठी बेडशीट भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रुग्णांना स्वच्छ आणि आरामदायक बेडशीट मिळाल्याने त्यांच्या आरोग्यसेवेत निश्चितच मदत होईल,असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ व जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनी सांगितले.
यावेळी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, फाउंडेशनचे ॲड .संतोष सावंत, सचिव प्रताप परब, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, सुनील खानोलकर, श्रीराम नाईक, सैनिक पत्ता संस्थेच्या संचालिका मानसी सावंत आदी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर पांडुरंग वज्राटकर यांच्याकडे बेडशीट सुपूर्त करण्यात आल्या.
सह्याद्री फाउंडेशन समाजात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या या कार्याबद्दल रुग्णालय प्रशासनाने सह्याद्री फाउंडेशनचे आभार मानले आहेत.

Exit mobile version