Site icon Kokandarshan

देवगड पुरळ येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पालकमंत्री ना. नीतेश राणे यांच्या वाढदिनी उबाठाच्या कार्यकर्त्यांचे अनोखे गिफ्ट

कणकवली,दि.२३ : देवगड – पुरळ येथील उबाठा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करत अनोखे गिफ्ट दिले आहे. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत असतानाच हा पक्ष प्रवेश झाला. यामध्ये मंगेश घाडी, उमेश डोंगरकर, नंदकुमार विलकर, जयप्रकाश पुजारे, मंगेश पुजारे, सागर तांबे, अक्षय विलकर, श्रेयस डोंगरकर, नामदेव मूळम, प्रथमेश देवळेकर आदींनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.

Exit mobile version