Site icon Kokandarshan

१ हजार वर्षांनी जिल्ह्यात सोमनाथ ज्योतिर्लिंगांच आगामन

माजी मंत्री केसरकरांच्या हस्ते रूद्रपूजा : शेकडो शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी

सावंतवाडी,दि.१८: १ हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ ”सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग” रुद्रपुजा माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडली‌. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूजा संपन्न झाली. यावेळी शेकडो शिवभक्तांनी केसरकर यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी गर्दी केली होती.

वैदिक धर्म संस्थान व दि आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते. दीपक केसरकर यांच्या हस्ते ज्योतिर्लिंगाची विधीवत पूजा संपन्न झाली‌. यानंतर शेकडो शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. शिव भक्तीत भक्तगण तल्लीन झाले होते. सकाळपासूनच मोठ्या संख्येने शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग,
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, भाजप शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अशोक दळवी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे हर्षल नाडकर्णी, दीपा सावंत, आनंद पोयेकर, बाळकृष्ण सावंत, अँड निता कविटकर, किरण नाटेकर, अर्चना पांगम, दिपाली सावंत, शुभांगी सुकी, भारती मोरे, नितिन मांजरेकर, सुरेंद्र बांदेकर, सत्यवान बांदेकर, विनोद सावंत, अर्चित पोकळे, गोविंद प्रभू, नंदू शिरोडकर, गजानन नाटेकर, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, शैलैश मेस्त्री आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री. केसरकर म्हणाले, मी एक शिवभक्त आहे‌. सावंतवाडी संस्थानचे कुलदैवत शंकर आहे. त्यामुळे लहानपणापासून आम्ही शिवशंकराची आराधना करतो. १२ ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं असं सोरटी सोमनाथ आहे‌. त्याकाळात अनेक हल्ले या मंदिरावर झालेत. शिवलिंग भंग करण्यात आलं. काही निष्ठावंत पुजाऱ्यांनी त्याचे अवशेष जपले. एक हजार वर्ष हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित होते. शंकराचार्य यांनी सांगितल्याप्रमाणे श्री श्री रविशंकर स्वामींजींच्या माध्यमातून ही परंपरा जपली जात आहे. चुंबकीय शक्ती असणार हे शिवलिंग अधांतरी राहत होते. ही अलौकीक अशी भारताची परंपरा होती. ती जपण्याचं काम ही मंडळी करत आध्यात्माच नेतृत्व करत आहे. आमच्या वास्तूत शिवलिंग आलं हे माझं भाग्य समजतो. ही भूमीच शंकराची आहे‌. या भूमीत ज्योतिर्लिंगाच आगमन होण भाग्याचं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोरटी सोमनाथ मंदिराची प्रतिष्ठापना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता या ठिकाणी अध्यक्ष आहेत‌. ते भव्य स्वरूप या अलौकिक ठेव्याला प्राप्त करून देतील. श्री श्री रविशंकर स्वामी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावे अशी आमची इच्छा आहे. त्यांचे भव्य स्वागत जिल्ह्यात केलं जाईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मुख्य प्रशिक्षक दर्शक हाथी म्हणाले, कोकण भूमी ही तपोभूमी आहे‌. कणकवली, सावंतवाडीत रूद्रपूजा झाली‌. भक्ती अन् श्रद्धा इथे नांदत आहे‌. एक हजार वर्षांपूर्वी आक्रमण झालं अस नाही, आजही ती होत आहेत. आम्ही कमजोर होतो तेव्हा ती आक्रमण होतात. त्यामुळे आपली संस्कृती, परंपरा मजबूत करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. याच दृष्टीने संपूर्ण कोकण दौरा आम्ही करत आहोत. रत्नागिरी, रायगड, मुंबईनंतर संपूर्ण देशभरात ही यात्रा होईल. त्यानंतर ज्योतिर्लिंगाची विधीवत पुनर्स्थापना केली जाईल. कोकणात येऊन आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version